बाजार समिती विषयी

कृषी उत्पन्न बाजार समिती, नेर

कृषि उत्पन्न बाजार समिती,नेर हि संस्था सन 1975 ला स्थापन झालेली आहे. स्थापनेपासुनच पदारुढ संचालक मंडळ,कर्मचारी,शेतकरी,व्यापारी व हमाल बांधव या सर्वांचा संस्थेबद्दल असणारा जिव्हाळा हया सर्वांच्या अथक परिश्रमातुन समितीला अल्पावधीत एक सक्षम व सर्व सोयींनी युक्त अशी बाजार समिती बनविण्यात यश संपादन करता आलेले आहे.

आपला देश कृषि प्रधान असुन बहुसंख्य लोक शेतीवरच अवलंबुन आहेत बाजारपेठेत योग्य भाव मिळावा शेतमालाचे वजन माप अचुक व काटेकोरपणे व्हावे या करीता बाजार समिती सदैव प्रयत्नशिल असुन शेतक­यांच्या हिताचे दृष्टीने नवनविन योजना आणुन शेतक­यांना त्याचा अधिकाधिक फायदा कसा मिळेल या करीता प्रयत्नशिल व कटीबध्द आहे.

आज संस्थेकडे शासनाकडुन मिळालेली स्वत:चे मालकीची मुख्य यार्डाची 10 एकर जागा व उपबाजार शिरसगांव (पाढंरी) येथे 5 एकर जागा आहे. आपले सर्वाचे सहकार्याने सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य झालेले आहे. आपणा सर्वांचे सहकार्याचे भावनेतुन संस्था अधिकाधिक सोयी व सुविधा देण्याकरीता प्रयत्नशिल आहे.

खास शेतकरी बांधवासाठी My APMC - माझी बाजारसमिती नावाचे मोबाईल ऍप विकसित केले आहे. या ऍप मध्ये शेतकऱ्यांना बाजारभाव, चालू घडामोडी , बातम्या, व्यापारी यादी, हवामान अंदाज व कृषि सल्ला इत्यादीची माहिती मिळते.